Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

जगन्नाथ रथयात्रेत पुन्‍हा चेंगराचेंगरी : तिघा भाविकांचा मृत्यू, ५० जखमी

Jagannath Rath Yatra :ओडिशातील पुरी येथे रथयात्रेदरम्यान आज (दि.२९ जून) पहाटे पुन्‍हा एकदा चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. दोन महिलांसह तिघा भाविकांचा मृत्यू झाला असून, ५० जण जखमी झाले आहेत. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे रथ, यात्रेचे उगमस्थान असलेल्या जगन्नाथ मंदिरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील श्री गुंडिचा मंदिराजवळ पोहोचले असता ही दुर्घटना घडली, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.

आज पहाटे सुमारे साडेचारच्या सुमारास, हे पवित्र रथ गुंडिचा मंदिराजवळ होते. दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. रथ जवळ येताच गर्दी आणखी वाढली, त्यात काही जण खाली पडले आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रभाती दास आणि बसंती साहू या दोन महिलांसह ७० वर्षीय प्रेमकांत मोहंती यांचा समावेश आहे. तिघेही ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यातील रहिवासी होते.

हेही वाचा – ओल्या कचऱ्यापासून ‘बायो-सीएनजी’ निर्मिती, दररोज ३०० टन कचऱ्यावर प्रक्रिया; नगरविकास विभागाची मंजुरी

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेली व्यवस्था अपुरी होती. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुघटनेबाबत माहिती देताना पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ एस स्वैन यांनी सांगितले की, घटनेतील ५० जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख बसंती साहू (बोलागड), प्रेमकांत मोहंती आणि प्रवती दास (दोघेही रहिवासी बालीपटना) अशी आहे. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि जखमींना मदत करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button