breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
विनाअनुदानित घरगुती वापराचा गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला
![An unsubsidised domestic gas cylinder has gone up by Rs 25](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/gas-cylinder.jpg)
नवी दिल्ली – घरगुती वापराचा विनाअनुदानित १४.२ किलोचा गॅस सिलिंडर आजपासून २५ रुपयांनी महागला आहे. यापूर्वी १८ ऑगस्टला हा सिलिंडर २५ रुपयांनी महागला होता. त्यामुळे १५ दिवसांत तो ५० रुपयांनी महागला आहे. यामुळे मुंबईत या सिलिंडरचा दर ८८४ रुपये ५० पैसे झाला आहे.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर आज जाहीर झाले. त्यात कमर्शियल आणि अनुदानित गॅस सिलिंडरचे दर कायम आहेत. मात्र विनाअनुदानित घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे मुंबई आणि दिल्लीत या सिलिंडरचा दर ८८४ रुपये ५० पैसे झाला आहे. कोलकात्यात ९११ आणि चेन्नईत ९०० रुपये ५० पैसे एवढा विनाअनुदानित गॅस सिलिंडर झाला आहे. १ ऑगस्टला हा गॅस सिलिंडर ८३४ रुपये ५० पैशांना होता.