breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

PhonePe चं भन्नाट फिचर, आता पिन न टाकता करता येणार पेमेंट

PhonePe : भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या PhonePe ने नुकतंच UPI Lite नावाचं नवीन फिचर आणलं आहे. हे फिचर आजपासून सुरु झालं आहे. हे सर्व बँकांद्वारे समर्थित फिचर आहे. आता हे यूपीआय लाईट (UPI LITE) फिचर युजर्सना कमी किंमतीचे पेमेंट करण्याची परवानगी देते.

वापरकर्ते या फिचरच्या माध्यमातून २०० रुपयांपर्यंतचा व्यवहार पिन न टाकतासुद्धा एका क्लिकवर करू शकणार आहेत. यासाठी सर्वप्रथम Phone pe App अपडेट करावं लागणार आहे. हे फिचर वापरण्यासाठी कोणत्याही केवायसीची आवश्यकता नाही, अशी माहीती आहे. यापूर्वी PAYTM ने ही सुविधा सुरू केली आहे.

PhonePe चे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राहुल चारी म्हणाले की, UPI Lite हा UPI स्टॅक ऑफरचा एक मुख्य भाग आहे. ज्याचा उद्देश वापरकर्त्यांचा डिजीटल पेमेंट करण्याचा अनुभव वाढवले हा आहे. UPI Lite सध्या असलेल्या UPI च्या पायाभूत सुविधांवर दबाव न आणता त्यांना वेगवान आणि सोपे करेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button