अरेरे, खळबळजनकः पुण्यात कोरोनाचा शिरकाव, पुणे विमानतळावर आढळला कोव्हिड पॉझिटीव्ह व्यक्ती
![Alas, Sensational: Corona enters Pune, Covid positive person found at Pune airport](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Pune-Airport-Korona-780x470.jpg)
पुणेः पुण्यातून करोना संबंधीत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. येथे विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीत एक प्रवासी करोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. ही व्यक्ती सिंगापूरहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. चीनमध्ये करोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर देशातील सरकारही अलर्टवर आहे. त्यासाठी सर्व राज्यांना सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विमानतळावर आंतरराष्ट्रीय करोना चाचणी ही अनिवार्य करण्यात आली आहे. त्याच दरम्यान, पुण्यातील विमानतळावर एक करोना पॉझिटीव्ह आढळल्याने राज्यासाठी ही धडकी भरवणारी बातमी आहे.
चीनमध्ये करोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे भारताचंही टेन्शन वाढलं आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतात करोनाची लाट येऊ नये यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सर्व राज्यांना सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विमानतळावर विदेशातून आलेल्या प्रवाशांची करोना चाचणी ही अनिवार्य करण्यात आली आहे. त्यादरम्यान पुणे विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीत एक प्रवासी करोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे.
पुणे विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीत हा प्रवासी करोना पॉझिटीव्ह असल्याचं कळालं आहे. या प्रवाशाचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तसेच, सध्या चिंता करण्याची गरज नसून गेल्या ८-१० दिवसांपासून आपण परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यास सुरुवात केल्याचं पुणे महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी सांगितलं.
करोना पॉझिटीव्ह आढळलेली व्यक्ती ही ३२ वर्षीय महिला आहे. तिला कोणतंही लक्षण जाणवत नाहीये. त्यांना सध्या घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशीही माहिती संजीव वावरे यांनी दिली.