Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल आणि मुलीस करोनाचा संसर्ग
![अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल आणि मुलीस करोनाचा संसर्ग](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/AKHILESH.jpg)
नवी दिल्ली |
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव आणि त्यांच्या मुलीला करोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत डिंपल यादव यांनी स्वत: ट्विटद्वारे माहिती दिली आहे. आपण पूर्णपणे वॅक्सीनेटेड आहोत आणि सध्या कुठलीही लक्षणे दिसत नाहीत, अशी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे.
डिंपल यादव यांनी ट्विटमध्ये म्हटले आङे की, मी कोविड टेस्ट केली ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी पूर्णपणे वॅक्सीनेटेड आहे आणि कोणतीही लक्षण सध्या दिसत नाहीत. स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मी स्वत:चे विलगिकरण करून घेतले आहे. तसेच, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपली तपासणी करून घ्यावी.