TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
हवाई दलाच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या
![Air Force personnel shot and committed suicide](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/New-Project-2022-10-22T170256.847-780x470.jpg)
देवळाली कॅम्प येथे हवाई दलाच्या शस्त्रागारात कार्यरत बिरेंद्र कुमार (२८) या जवानाने पिस्तुलीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. बिरेंद्र कुमार हे हवाई दलाच्या शस्त्रागारात रात्रपाळीत कामावर होते. यावेळी पिस्तुलीतून स्वत:वर गोळी झाडली. सहकारी जवानांनी लगेच धाव घेतली.
बिरेंद्र कुमार यांना तातडीने हवाई दल केंद्रातील रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, त्यांचा तत्पुर्वीच मृत्यू झाल्याचे फ्लाईट लेफ्टनंट डॉ. नवनीत यांनी घोषित केले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.