breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
३ दिवसांनंतर इंधन पुन्हा महागले; परभणीत पेट्रोल ११० रुपये लिटर
![After 3 days, fuel became expensive again; Petrol in Parbhani is Rs 110 per liter](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/petrol-diesel_2017086116.jpg)
नवी दिल्ली – तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा इंधन दरवाढ केली. त्यात पेट्रोल ३१ ते ३९ पैसे आणि डिझेल १५ ते २१ पैशांनी महागले आहे. या इंधन दरवाढीमुळे परभणीत पेट्रोलच्या दराने ११० रुपयांचा टप्पा गाठला आहे.
आजच्या पेट्रोल दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर १०१ रुपये ५४ पैसे लिटर आणि डिझेल ८९ रुपये ८७ पैसे लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल १०७ रुपये ५४ पैसे आणि डिझेल ९७ रुपये ४५ पैसे लिटर झाले आहे. परभणीत पेट्रोलच्या दराने विक्रम केला आहे. तिथे पेट्रोल १०९ रुपये ८० पैसे लिटर आणि डिझेल ९८ रुपये १४ पैसे लिटर झाले आहे.