breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

टोक्यो ऑलिम्पिकसाठी सराव करणाऱ्या महिला सर्फिंगपटूचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

न्यूयॉर्क – मध्य अमेरिकेतील एल साल्वाडोअरमधून एक धक्कादायक बातमी समोर आळी आहे. साल्वाडोअरची २२ वर्षीय सर्फिंगपटू कॅथरीन डियाज हर्नानडेजचा शनिवारी दुर्देवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सर्फिंगचा सराव करत असताना अंगावर वीज कोसळल्याने कॅथरीनचा मृत्यू झाला. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी पाचच्या सुमारास कॅथरीन सर्फिंगचा सराव करत असताना हा अपघात झाला.

कॅथरीन एल टुंको येथे सर्फिंगचा सराव करण्यासाठी गेली होती. मात्र ती समुद्रात सराव करत असतानाच तिच्यावर वीज पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर कॅथरीनच्या मित्रांनी आणि जवळच उपस्थित असलेल्या लोकांनी रुग्णवाहिका बोलावून तिला रुग्णालयात पोहचवलं. मात्र कॅथरीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. कॅथरीनचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला. वीज अंगावर पडल्याने तिच्या शरीराचा बराचसा भाग जळाला होता. कॅथरीनने ग्लोबल सर्फ कॉनटेस्टमध्येही सहभाग घेतला होता. कॅथरीन ही साल्वाडोअरच्या राष्ट्रीय सर्फिंग संघाचीही सदस्य होती.

टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी सध्या कॅथरीन प्रयत्न करत होती. त्यासाठीच ती सराव करत होती जेव्हा हा अपघात घडला. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच सर्फिंग या खेळाचा समावेश करण्यात आला असून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं कॅथरीनचं स्वप्न होतं. कॅथरीन ही पेशाने शेफ होती. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्येही कुक या शब्दाचा समावेश यामुळेच आहे. कॅथरीन सायंकाळी एका हॉटेलमध्ये नोकरी करायची आणि सकाळी सर्फिंगचा सराव करायची. विकेण्डला कॅथरीन सायंकाळी सरावसाठी बाहेर पडायची. याच सरावादरम्यान शनिवारी (२० मार्च २०२१) सायंकाळी कॅथरीनवर वीज पडली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button