breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेश

Turkey Earthquake 2023 : तुर्कस्तानमध्ये मोठा भूकंप, शेकडो जणांचा मृत्यू!

Turkey : तुर्कस्तानमध्ये जोरदार भूकंप झाला असता या देशासह सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल हे देशही हादरले आहेत. आज पहाटे अंदाजे 4 वाजेच्या सुमारास भूकंप होऊन तुर्कीमध्ये आतापर्यंत 284 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 440 जण जखमी झाल्याची माहीती आहे. यात हजारो मृत्यू होऊ शकतात, असा अंदाजही व्यक्त होतोय.

भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्कस्तानमध्ये आणि त्याच्या जवळील सीरियाच्या भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तुर्कस्तानपाठोपाठ सीरियामध्ये 237 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 639 जखमी झाले. हे जोरदार भूकंपाचे धक्के लेबनॉन आणि इस्रायलमध्येही जाणवले पण येथे जास्त नुकसान झाले नाही.

भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कियेमधील गझियानटेप शहर होते. हे सीरिया सीमेपासून 90 किमी दूर आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या भागात अधिक विध्वंस झाला. अंकारा, गझियानटेप, कहरामनमारा, दियारबाकीर, मालत्या, नुरदगी शहरासह 10 शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, जिथे 250 हून अधिक इमारती कोसळल्याची माहीती आहे.

युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कहरामनमारस भागातील गझियाटेप शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आणि जमिनीपासून जवळपास 24 किलोमीटर खाली होता. स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.17 वाजता हा भूकंप झाला असल्याची माहीती स्थानिकांनी दिली आहे. 11 मिनिटांनंतर 6.7 रिश्टर स्केलचा दुसराही भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून 9.9 किलोमीटर खाली होते. दुसऱ्या भूकंपानंतर 19 मिनिटांनी 5.6 रिश्टर स्केलचा तिसराही भूकंप झाला. यामुळे अनेक जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याने संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होतेय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button