Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशात गेल्या २४ तासांत ८४ हजार ३३२ नवे रुग्ण;पण मृतांची संख्या चिंता वाढवणारी
![The number of new corona victims in the country is below 40,000](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-5174671_1920-1-8.jpg)
नवी दिल्ली – कोरोना रुग्णांची संख्या गेल्या २४ तासांत ८५ हजारांच्याही खाली गेली आहे. गेल्या ७० दिवसांतील ही सर्वाधिक कमी रुग्णसंख्या आहे. मात्र, मृतांच्या आकड्यात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत देशात ८४ हजार ३३२ नवे रुग्ण सापडले आहे तर ४ हजार रुग्णांचे प्राण गेले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,21,311 इतकी आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 84,332
देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,21,311
देशात 24 तासात मृत्यू – 4,002
एकूण रूग्ण – 2,93,59,155
एकूण डिस्चार्ज – 2,79,11,384
एकूण मृत्यू – 3,67,081
एकूण सक्रिय रुग्ण – 10,80,690
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 24,96,00,304