breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

72 तासात ह्यूस्टनमधील वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश

अमेरिका आणि चीनचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. मंगळवारी रात्री अमेरिकेच्या ह्यूस्टनमधील चीनच्या वाणिज्य दूतावासात हजारो डॉक्यूमेंट्स जाळण्यात आले. या घटनेच्या काही तासानंतर अमेरिकेने चीनला 72 तासांच्या आत दूतावास बंद करण्यास सांगितले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने याबाबत माहिती दिली आहे.

मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास ह्यूस्टनमधील चीनी कॉन्स्युलेटच्या मागील बाजूस आग लागलेली दिसली. आसपासच्या नागरिकांनी अग्नीशमन विभागाला याची माहिती दिली. काही मिनीटातच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले, पण त्यांना आत जाऊ दिले नाही. काही वेळानंतर आग शांत झाली.

कॉन्स्युलेटच्या जवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने घटनेचा व्हिडिओ काढला. यात स्पष्ट दिसत आहे की, फायबरच्या कॅरेट्समध्ये कागदपत्र आणून त्यांना आग लावली जात आहे. अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आत जाण्यास रोखले आणि घटनेबाबत दूतावासही काही सांगण्यात तयार नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button