breaking-newsताज्या घडामोडी

बाळाचा जन्म होताच खात्यात जमा होतील ६००० रुपये; सरकारच्या या योजनेचा लाभ कसा घ्याल?

Pradhan Mantri Matru Vandana Yojana | सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. सरकारची अशी एक योजना आहे ज्यामुळे गर्भवती मातांना आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारने मातृत्व वंदन योजना लागू केली आहे. पंतप्रधान मातृत्व योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली आहे.

पंतप्रधान मातृत्व योजनेसाठी पात्र महिलांना हफ्तांमध्ये ६००० रुपये रक्कम दिली जाते. देशभरात कुपोषण हा विषय गंभीर आहे. कुपोषण थांबवण्यासाठी सरकारकडून मातृत्व वंदन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा    –     ‘पंतप्रधान मोदी ओबीसी असल्याचा दावा खोटा’; राहुल गांधींचा आरोप 

सरकार ६००० रुपये मुलांच्या पोषणासाठी व आजारपणासाठी देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांचे वय १९ ते ५५ वर्ष असायला हवे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १००० रुपये, दुसऱ्या टप्प्यात २००० रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात २००० रुपये गर्भवती महिलांना दिले जातात. तर बाळ जन्मल्यानंतर १००० रुपये महिलेच्या खात्यात जमा होतात.

तसेच या योजनेसंदर्भात माहिती हवी असल्यास ७९९८७९९८०४ या हेल्पलाइनवर फोन करु शकता. व या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button