देशात गेल्या २४ तासात ४८ हजार ६९८ नवे कोरोना रुग्ण;१,१८३ कोरोनाबळी
![48 thousand 698 new corona patients in the last 24 hours in the country; 1,183 corona victims](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/319718852-corona-1532x900-adobestock-1.jpg)
नवी दिल्ली – गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची भारतात नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ४८,६९५ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर १,१८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी २१ जून रोजी ४२,६४० रुग्णांची नोंद झाली होती. तसेच, गेल्या २४ तासात ६४,८१८ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहे. त्यामुळे १७,३०३ सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ची भर पडली आहे. तर ६४ हजार ८१८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. शुक्रवारी १,१८३ रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशात आतापर्यंत ३ कोटी १ लाख ८३ हजार १४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २ कोटी ९१ लाख ९३ हजार ८५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आपापर्यंत देशात ३ लाख ९४ हजार ४९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ५ लाख ९५ हजार ५६५ सक्रिय रुग्ण आहेत.
देशातील कोरोना मृत्यूंचे प्रमाण १.३१ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. देशात २ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत जगाच्या तिसऱ्या स्थानी आहे तर एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. जगात सर्वाधिक मृत्यू हे अमेरिकेत आणि ब्राझीलमध्ये झाले आहेत त्यानंतर भारताचा क्रमांक आहे.
देशात सलग ४४ व्या दिवशी नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. २५ जूनपर्यंत देशभरात ३१ कोटी ५० लाख नागरिकांना करोनावरील लस देण्यात आली आहे. शुक्रवारी ६१ लाख १९ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर आतापर्यंत ४० कोटी करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शुक्रवारी १७ लाख करोना नमुना चाचण्या घेण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ५१ नवे रुग्ण
केंद्र सरकारने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात डेल्टा प्लसचे व्हेरिएंटच्या ४५ हजार चाचण्यांमधून ५१ बाधितांची नोंद १२ राज्यांमध्ये नोंदवण्यात आली आहेत. त्यापैकी २२ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत.