आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार!
![2000 rupees will be deposited in the bank account of farmers today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/PM-Kisan-Yojana-780x470.jpg)
PM Kisan Yojana | केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना टप्याटप्प्याने २००० रुपये दिले जातात. अशातच आता शेतकरीवर्ग या योजनेच्या १७ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच आज शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे २००० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर आज पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. वाराणसीत शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी ही भेट देणार आहेत. याशिवाय, स्वयं-सहायता गटांच्या (SHGs) ३०,००० हून अधिक सदस्यांना प्रमाणपत्रे देखील नरेंद्र मोदी प्रदान करतील. त्यांना कृषी सखी म्हणून प्रशिक्षित करण्यात आले आहे, जेणेकरून ते पॅरा-विस्तार कामगार म्हणून काम करू शकतील आणि शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत करू शकतील.
हेही वाचा – ‘भाजपा, मिंधे गँग आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून अनेकजण बाहेर पडतील’; आदित्य ठाकरेंचं विधान
देशातील साधारण ९.२६ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर आपली ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.