breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेश

आफ्रिकेतील बोक्सबर्गमध्ये गॅस टँकरचा भीषण स्फोट होऊन २० जणांचा मृत्यू

बोक्सबर्गः दक्षिण आफ्रिकेतील बोक्सबर्गमध्ये गॅस टँकरचा भीषण स्फोट होऊन २० जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच सध्या घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे गॅस टँकर एका अंडरपासमध्ये अडकल्यानंतर गॅसच्या गळतीला सुरूवात झाली. बोक्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील गौटँग प्रांतामधील एक शहर आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. हा भीषण स्फोट ओआर टँबो मोमोरियल रूग्णालयापासून काही अंतरावर झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

दरम्यान, या घटनेनंतर आपत्कालीन व्यवस्था पथकं घटनास्थळी तातडीने दाखल झाली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना
बिहारमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मोतिहारी येथील नरिलगिरीमधील वीटभट्टीच्या चिमणीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २० जण बेपत्ता झाले आहेत. बचावकार्यासाठी घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button