देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2 लाख 51 हजार 209 नवे रुग्ण
नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशातील कोरोनाचा विळखा सैल होताना पाहायला मिळतोय. दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूची 2 लाख 51 हजार 209 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 627 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत हे प्रमाण 12 टक्क्यांनी कमी झाले आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर आता 15.88 टक्क्यांवर आला आहे. मोठी गोष्ट म्हणजे कालपासून देशात 12 टक्के रुग्ण कमी झाले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
देशात 21 लाख 5 हजार 611 सक्रिय कोरोनाबाधित
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 21 लाख 5 हजार 611 इतकी झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 92 हजार 327 झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत तीन लाख 47 हजार 443 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 80 लाख 24 हजार 771 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 164 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत 164 कोटीहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 57 लाख 35 हजार 692 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 164 कोटी 44 लाख 73 हजार 216 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.