breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

17 देशी बॉम्ब, 116 जिवंत काडतुसे, भाजपा नेत्याच्या घरातील शस्त्रसाठ्याने खळबळ

भोपाळ – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पोलीस यंत्रणांही अनेक ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यातच मध्य प्रदेशातील भारतीय जनता पार्टीचे नेते संजय यादव यांच्या घरावर मध्य प्रदेशपोलिसांनीधाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांकडून संजय यादव यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

मध्य प्रदेश पोलिसांकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. सोमवारी पोलीस अधिक्षक यांगचेन डी भूटिया यांच्या टीमला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संजय यादव यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये संजय यादव यांच्या घरातून 13 पिस्तुल, 17 देशी बॉम्ब आणि 116 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ माजली आहे.

पोलिसांनी आरोपी संजय यादवविरोधात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. संजय यादव यांच्यासोबत त्याचा सहकारी गोपाळ जोशी याच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

संजय यादवविरोधात 47 गुन्हे

सेंधवा शहरात संजय यादव आणि गोपाळ जोशी यांच्या दोन टोळ्या सक्रीय आहेत. त्यांच्याविरोधात खंडणी, मारहाण, हत्या, धमकावणे यासारखे अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. संजय यादवच्या विरोधात 47 गुन्हे तर गोपाळ जोशीवर 30 गुन्ह्यांची नोंद आहे अशी माहिती एसपी यांगचेन भूटिया यांनी दिली

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गॅंग एक मोठं षडयंत्र आखत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अजूनही अनेक नावे यात समोर येतील त्यांना पकडण्याचा प्रयत्न पोलिस करत आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत 7 करोड रुपयांची दारु, ड्रग्स, बनावटे वाहने आणि हत्यारे जप्त केली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button