Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशात २४ तासांत १४,६२३ नवे कोरोना रुग्ण, १९७ कोरोनाबळी
![14,623 new corona patients, 197 corona victims in 24 hours in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/corona-1.jpg)
नवी दिल्ली – सुरुवातीला धडकी भरवणारी कोरोनाची रुग्णसंख्या आता बरीचशी आटोक्यात आली आहे. मागील २४ तासांत देशात १४ हजार ६२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १९ हजार ४४६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तसेच १९७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या ३ कोटी ४१ लाख ०८ हजार ९९६ वर पोहोचली आहे. यापैकी ३ कोटी ३४ लाख ७८ हजार २४७ जण कोरोनातून बरे झाले आहेत, तर ४ लाख ५२ हजार ६५१ जणांनी आपला जीव गमावला आहे. तसेच सध्या १ लाख ७८ हजार ०९८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम देशभरात वेगाने सुरू आहे. लवकरच भारत १०० कोटी डोसचा टप्पा गाठणार आहे. आतापर्यंत ९९ कोटी १२ लाख ८२ हजार २८३ जणांना लस देण्यात आली आहे. मागील २४ तासांत ४१ लाख ३६ हजार १४२ जणांना लस दिली गेली.