देशात 24 तासांत 14,306 नवे कोरोना रुग्ण, 400 हून अधिक मृत्यू
नवी दिल्ली – देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हळहळू खाली येताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 443 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 हजार 762 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण 3 कोटी 41 लाख 89 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 4 लाख 54 हजार 712 रुग्णांचा मृत्यू झाला, तर तब्बल 3 कोटी 45 लाख 67 हजार जणांनी कोरोनावर मात केली. तसेच सध्या 1 लाख 67 हजार 695 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
त्याचबरोबर राज्याच्या आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 हजार 410 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 18 रुग्णांनी आपला जीव गमावला. तसेच 1 हजार 520 जणांनी कोरोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्क्यांवर पोहोचले आहे.