Breaking-newsताज्या घडामोडी
जेडीएस-काँग्रेसच्या 17 अपात्र आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
![Tractor march of farmers on Republic Day; Important decision given by the Supreme Court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/supremecourt.jpg)
मुंबई : कर्नाटकच्या काँग्रेस व जेडीएसच्या 17 अपात्र आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय दिला आहे. याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस आणि जेडीएसच्या 17 आमदारांना अपात्र घोषित केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की, हे 17 अपात्र आमदार निवडणूक लढवू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाने हे देखील सांगितले की, विधानसभा अध्यक्ष कोणत्याही आमदाराला उपनिवडणूक लढवण्यापासून थांबवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, आमदारांना अपात्र घोषित केले असले तरीही 2023 पर्यंत त्यांना अपात्र ठरवणे चुकीचे आहे. याचिकेत कर्नाटक आमदारांना अध्यक्षांनी अपात्र ठरवले होते यावर दावा करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने 25 ऑक्टोबरला सगळ्या पक्ष्यांना ऐकल्यानंतर हा निर्णय घेतला होता.