देशात ११ हजार ४९९ नवे बाधित, २३ हजार रुग्णांची कोरोनावर मात
![11 thousand 499 newly infected, 23 thousand patients overcome corona in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/corona-5.jpg)
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
देशात कोरोनाचे संकट हळूहळू कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ११ हजार ४९९ नवे बाधित आढळले आहेत. कालपेक्षा ही संख्या कमी आहे. तर २५५ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार आज ११ हजार ४९९ नवे बाधित सापडले असून २३ हजार ५९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर २५५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या देशात १ लाख २१ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू असून पॉझिटीव्हिटी रेट १.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत देशात ४ कोटी २२ लाख ७० हजार ४८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत ५ लाख १३ हजार ४८१ जणांनी जीव गमावला आहे.
शुक्रवारी दिवसभरात २८ लाख २९ हजार ५८२ डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत १७७ कोटी १७ लाख ६८ हजार ३७९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 1.98 कोटी पेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत. देशात कोविड विरोधी लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.