१६०० अंश तापमानात वितळलेले लोखंड अंगावर पडून ५ कामगार ठार, ६ जण गंभीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Burn-3.jpg)
जालना | सोळाशे अंश सेल्सियस तापमानात वितळवलेल्या लोखंडाचा तप्त रस अंगावर पडल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. उपचारांदरम्यान दोन जणांची प्राणज्योत मालवली. या भीषण दुर्घटनेत ६ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जालना एमआयडीसीतील ओम साईराम स्टील कंपनीत गुरुवारी दुपारी ४ वाजेदरम्यान ही घटना घडली.
भंगार वितळल्यानंतर तयार झालेले लोखंडाचे पाणी क्रेनद्वारे बिलेट (पट्ट्या) तयार करण्याच्या साच्यात ओतताना हा प्रकार घडला. रात्री उशिरा कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुरुवारी कंपनीत नेहमीप्रमाणे काम सुरू होते. दुपारी ४ वाजेदरम्यान अचानक लोखंडाचे वितळते पाणी भट्टीच्या खाली आणि बाजूला काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडले. यात तीन जण जागीच ठार, तर ८ कामगार जखमी झाले. घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने तातडीने तिन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले.
जखमींना जालन्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. एकाच रस्त्यात, तर दुसऱ्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.