Breaking-newsताज्या घडामोडी
१२ वी परीक्षेत पहिल्याच दिवशी कॉपी करताना १९ जण जाळयात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/exam-student.jpg)
नाशिक | महाईन्यूज
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा १२ वीला मंगळवारपासून सुरुवात झाली. परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त होण्यासाठी शिक्षण मंडळ प्रयत्नशील असले तरी पहिल्याच दिवशी नाशिक विभागात १९ जणांना कॉपी करताना भरारी पथकांनी ताब्यात घेतलेले आहे.
इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडविताना भरारी पथकाला १९ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. नाशिक जिल्ह्य़ात सर्वाधिक म्हणजे १० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून धुळे जिल्ह्य़ात परिस्थिती सामान्य राहिली आहे.
जळगाव येथे सात, नंदुरबार येथे दोन विद्यार्थी कॉपी करताना सापडले. त्यांच्यावर शिक्षण मंडळाने आवश्यक कारवाई करत पुढील परीक्षेला बसण्यास बंदी केलेली आहे.