breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

होय, दाऊद इब्राहिम कराचीतच, पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली

इस्लामाबाद | कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं उघड झालं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील याला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानमधील माध्यमांनीच यावर प्रकाश टाकला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्यावतीने (UNSC) जगभरातील 88 दहशतवादी नेत्यांची एक यादी तयार करण्यात आली आहे. यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचीही नावं आहेत.

पाकिस्तान सरकारने दाऊद इब्राहिमची स्थीर आणि जंगम अशी सर्व मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अहवालात देण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यामागे तोच मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे.

मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 350 लोकांना आपला प्राण गमवावा लागला होता. तसेच 1200 हून अधिक लोक जखमी झाले होते. भारत सरकारने 2003 मध्ये अमेरिकेसोबत मिळून दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button