breaking-newsताज्या घडामोडी

हेल्मेटबरोबर मास्कही घालणं बंधनकारक,अन्यथा दंड भरावा लागू शकतो.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र काही वाहनचालक मास्क न घालताच फिरत आहेत. चौकांमध्ये पोलिस नसले कि मास्क घातलं नाही तरी चालेन असं वाटून अनेक जण मास्क घालण टाळतात..किंवा हेल्मेट घातल्यावर मास्क नाही घातल तरी चालेल असं वाटून वाहनचालक मास्क घालणं टाळतात…पण सीसीटीव्हीचा मात्र नागरिकांवर ‘वॉच’ सतत राहणार आहे. त्यामुळे वाहन चालवताना हेल्मेटसोबत मास्क घातलं नाही तर दंड भरावा लागू शकतो.

वाहन चालवताना मास्क न घालणारे १४८ वाहन चालक नागपूर पोलिस आणि महापालिकेच्या सीसीटीव्हीत ‘कैद’ झाले आहेत. या वाहनचालकांना लगेच ई-चलान पाठविण्यात आले आहे. केवळ चलान पाठवून पोलिस शांत बसले नाहीत, तर त्यांनी मास्क न घालणाऱ्या वाहनचालकांकडून ७४ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button