breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हायड्रोक्सीक्लोरोक्विनचे 6 डोस घेऊन 80% आरोग्य कर्मचारी संक्रमणापासून वाचले, 4 डोस घेताच घटतो कोरोनाचा धोका

नवी दिल्ली | कोरोना व्हायरस विरोधात लढताना हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधींवर केलेल्या संशोधनातून चांगले निष्कर्श समोर आले आहेत. इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च ICMR च्या अभ्यासातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधीचे 6 डोस घेतल्यानंतर 80% हेल्थकेयर वर्कर कोरोनाच्या संक्रमणापासून वाचले आहेत. या औषधीचे 4 डोस घेता कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका कमी होण्यास सुरुवात होते.

तरीही बचावासाठी केवळ हायड्रोक्सीक्लोरोक्विन घेऊन चालणार नाही. यासोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट आणि इतर महत्वाची उपकरणे वापरणे अत्यावश्यक आहे. हेल्थकेयर वर्कर्स दोन गटांत विभाजित करण्यात आले होते. त्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आणि कोरोना निगेटिव्ह असे गट करण्यात आले होते. पहिल्या गटात 378 तर दुसऱ्या गटात 373 लोक सामिल झाले होते. दोन्ही ग्रुपमध्ये देण्यात आलेल्या हायड्रोक्सीक्लोरोक्विनचे परिणाम जवळपास एकसारखेच होते. दोन्ही गटातील लोकांना उलट्या, डोकेदुखी आणि हगवण अशा समस्या झाल्या होत्या. काही लोकांना स्किन रॅशेस सुद्धा दिसून आले. ICMR ने संशोधनाच्या अहवालात सांगितले की हेल्थकेयर वर्कर्समध्ये कोरोनाच्या संक्रमणाचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे, जगभरात त्यांच्या आरोग्यावर चिंता व्यक्त केली जाते.

अशात हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषध दिल्याचे परिणाम सांगणारा रिसर्च जगभरात अतिशय महत्वाचा ठरेल.जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधींच्या साइड इफेक्टवर चिंता व्यक्त करताना या औषधींचे वैद्यकीय प्रयोग थांबवले होते. परंतु, भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ (ICMR) ने आपले प्रयोग सुरूच ठेवले. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, काउंसिलने या औषधीचे सकारात्मक परिणाम पाहिले आहेत. याचे साइड इफेक्ट असले तरीही ते कमी आहेत. सरकारने देखील यापूर्वीच स्पष्ट केले होते, की स्पेशल कोव्हिड-19 रुग्णालय नसलेल्या रुग्णालयांत कोरोनाची लक्षणे नसलेल्या परंतु, कोरोना रुग्ण असलेल्यांना या औषधी वापरता येतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button