breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हाथरस प्रकरणी हायकोर्टाने प्रशासनाला फटकारले, पोलीस महासंचालक घेणार कुटुंबीयांची भेट

लखनऊ | हाथरस येथील दलित कुटुंबातील १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि अमानुष अत्याचारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यामध्ये स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून समाजातून आणि राजकीय स्तरातून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. यावर अलाहाबाद हायकोर्टानेही प्रशासनाला फटकारले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक एच. सी. अवस्थी आज पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.

हाथरस प्रकरण आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात घडलेल्या इतर दोन सामुहिक बलात्कार आणि जीवे मारण्याच्या घटनांमुळे योगी सरकारविरोधात देशभरातून टीका होत आहे. यामध्ये एका ११ वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या टिकेनंतर हाथरस प्रकरणी योगी सरकारने काल पाच पोलीस कर्मचाऱ्यांसह जिल्हा पोलीस प्रमुखांना निलंबित केलं. तत्पूर्वी सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची घोषणा केली.

हाथरस प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने टॉपच्या सरकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना समन्स बजावले असून १२ ऑक्टोबर रोजी सर्व कागदपत्रांसह कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. यापार्श्वभूमीवर आज हे उच्चाधिकारी पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत. या प्रकरणी कोर्टानं म्हटलं होतं की, “हे गंभीर प्रकरण असून यामध्ये मूलभूत मानवी अधिकारांचं उल्लंघन झाल्याचा पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप आहे.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button