स्व. फत्तेसिंग नाईक यांचे स्मारक सजाजसेवेसाठी स्फूर्तीस्थळ : शरद पवार
![Late. Inspiration for Fateh Singh Naik's memorial decoration service: Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Manshing-Nike-Shirala.jpg)
- शिराळा येथे स्व. फत्तेसिंग नाईक स्मृतिस्थळाचे लोकार्पण
- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील यांचीही उपस्थिती
सांगली । प्रतिनिधी
स्व. फत्तेसिंग नाईक यांनी शिराळा मतदारसंघ व शाहूवाडी तालुक्याच्या विकासासाठी भगीरथ प्रयत्न केले. सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य समर्पित केले. कष्टकरी, शेतकरी व समाजाच्या तळागाळातील जनतेप्रती कार्य करण्यासाठी हे स्फूर्तीस्थळ आपणांस चिरंतन प्रेरणा देत राहील, असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
शिराळा तालुक्यातील चिखली येथे विश्वास सहकारी साखर कारखाना परिसरात लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांचे स्मृतिस्थळ व पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या स्मृतिस्थळाच्या लोकार्पण सोहळा खासदार शरद पवार यांच्या उपस्थित झाला.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंग नाईक, सुनंदा पाटील आदी उपस्थित होते.
सांगलीतील विश्वास सहकारी साखर कारखाना परिसरात लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांचे स्मृतिस्थळ व पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या स्मृतिस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून स्व. फत्तेसिंगराव नाईक यांचे पुण्यस्मरण केले. @Jayant_R_Patil @Balasaheb_P_Ncp #Sangli pic.twitter.com/SX1OLXU8El
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 22, 2021