breaking-newsताज्या घडामोडी
सोलापूरात कोरोनाचे 21 नवीन रुग्ण
![#Coronavirus: Only 19 patients treated under Ayushman Bharat Yojana, RTI reveals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/coronaviruspatients.jpeg)
सोलापूर | सोलापूरकरांना चिंतेत टाकणारी एक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात आज कोरोनाचे तब्बल 21 नवीन रुग्ण आढळून आले आहे. एकाच दिवशी कोरोनाचे एवढे रुग्ण आढळून आल्यानं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्यानं सोलापूरकरांची चिंता आणखीच वाढली आहे. दरम्यान आजच्या दिवशी कोरोनाचे 21 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता 102 वर गेला आहे. यापैकी 3 रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी परतले आहे तर आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.