सोलापूरात आणखी 10 नवे कोरोना विषाणूबाधित रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-85.png)
सोलापूर शहरात आणखी १० कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे आता सोलापूर शहराचा आकडा अशा तऱ्हेने सोलापूर शहराचा आकडा हा १२ वर पोहोचला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी सोलापुरात एकही कोरोना विषाणूबाधित रुग्ण नव्हता. मागील रविवारी पहिला रुग्ण सापडला. या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
एका रुग्णालयातील कर्मचारी महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली होती. तिच्या संपर्कात आलेल्या ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एकाचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तो कोरोना विषाणूबाधित असल्याचा अहवाल आला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एकाला कोरोनाची लागण झालेली आहे.
सोलापुरात यापूर्वी जे दोन रुग्ण सापडले. ते पाच्छा पेठ परिसरातीलच नवे रुग्ण आहेत. प्रशासनाने हा परिसर यापूर्वीच सील केला आहे. सर्व बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे. दरम्यान सोलापुरातील रुग्णांसह राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडाही वाढला आहे. १२ तासांत राज्यात १६५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.