Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या गिरट्या, भारतीय सैन्याने गोळीबार करताच फिरले माघारी
![Big news! Drone attack on Saudi Arabia airport](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/drone-pak.jpg)
पंजाब: भारताचा वादग्रस्त शेजारी पाकिस्तान आपल्या कुरापती सतत करतच असतो. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासोबतच भारत-पाकिस्तान सीमेवर घुसखोरी करण्याच्या प्रयत्नातही पाकिस्तान सतत असतो.
मात्र भारतीय सेना त्यांचे मनसुबे उधळून लावत असते. याच क्रमात नुकत्याच समोर आलेल्या घटनेत पाकिस्तानचा ड्रोन भारताच्या गुरदासपूरमध्ये दिसला आहे. त्यानंतर भारतीय सैन्याने गोळीबार करत परत माघारी धाडलेले आहे.