breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात पाईपलाईन करताना नियंत्रण सुटले; जेसीबीसह चालक बुडाला विहिरीत

विहिरीलगत पाईप लाईनचे काम करण्यासाठी चारी घेत असताना जेसीबीसह चालकाचे नियंत्रण सुटल्याने जेसीबीसह चालक विहिरीत पडल्याने बुडाला. बिदाल (ता. माण) येथे ही दुर्घटना घडली. वैभव भरत मुळीक (वय, २५) हा जेसीबीचालक मशीनसह विनायक जगदाळे यांच्याविहिरीवर पाईपलाईन करण्यासाठी चारी काढण्यासाठी आला होता. विनायक जगदाळे हे कुठून कशी पाईपलाईन न्यायची यासाठी फक्की टाकत होते. तर वैभव याने जेसीबीच्या सहाय्याने विहीरीलगतची जागा साफ करण्यास सुरुवात केली. मात्र, साफसफाई करीत असताना वैभवचे जेसीबी मशीनवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मातीवरुन जेसीबी मशीन घसरुन वैभव मशीनसह थेट विहिरीतील पाण्यात पडला. काही कळण्याच्या आतच पंचवीसपेक्षा जास्त फूट खोली असलेल्या पाण्यात वैभव जेसीबीसह बुडाला.

त्यानंतर विनायक जगदाळे यांनी तत्काळ या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर वेगाने हालचाली करुन बचाव कार्यसाठी दोन जेसीबी, एक पोकलेन व एक क्रेनला पाचारण करण्यात आले. या ठिकाणी आणलेल्या मशिनींच्या सहाय्याने बुडालेला जेसीबी बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र, प्रयत्न करुनही वैभवचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे वीज पंपाच्या सहाय्याने विहिरीतील पाणी काढण्यास सुरूवात करण्यात आली. एका मोटारीने पाणी निघणे शक्य नसल्याचे लक्षात येताच पाणी काढण्यासाठी एकूण तीन मोटारी लावण्यात आल्या. दुपार उलटून गेली तरी विहरीतील पाणी निघाले नव्हते. तसेच वैभवचा शोध लागलेला नव्हता. या घटनेची माहिती कळताच माणच्या तहसीलदार बाई माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी झालेली बघ्यांची गर्दी नियंत्रित करताना पोलीस कर्मचाऱ्यांची दमछाक झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button