breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
सांगोला तालुक्यातील लष्करी जवानाचा कोरोनाने मृत्यू
सोलापूर – सांगोला तालुक्याच्या कमलापूर येथील मूळ रहिवासी भारतीय लष्करातील जवान अमोल किरण आदलिंगे (३०) यांचा भारत-चीन सीमेवर सिक्कीममध्ये कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
आदलिंगे हे २०१२ साली हैदराबाद येथून भारत-तिबेट सीमा पोलीस दलात भरती झाले होते. सिक्कीममध्ये नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. मृत आदलिंगे यांच्या पार्थिवावर सिक्कीम येथेच भारत-तिबेट सीमा पोलीस दलाकडून अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे आदलिंगे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.