Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
सांगलीत चांदोली परिसरात अति जोरदार पाऊस;वारणा नदीवरील काखे-मांगले पूल पाण्याखाली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/sangali.jpg)
सांगली : चांदोली परिसरात मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या जोरदार पाऊसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या ठिकाणी तीन आठवड्यापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती.
मागील दोन दिवसापासून पाऊसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे वारणा नदीवरील काखे-मांगले पूल पाण्याखाली गेला. याठिकाणीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सांगली -कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल आहे. यामुळे या दोन जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे.