breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सलून आणि दारूची दुकाने उघडण्याचे आदेश नाहीत, केंद्र सरकारचं स्पष्टिकरण

गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात निवासी भागात असलेली दुकानेही सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हॉटस्पॉटची ठिकाणांशिवाय शहरी भागातील दुकाने उघडण्यासही मुभा देण्यात आली आहे. मात्र मद्य विक्रीची दुकाने आणि सलून बंदच ठेवण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे.

सलून ही सेवा प्रकारात येतं. केंद्र सरकारने केवळ सामान विकणाऱ्या दुकानांनाच सुरू करण्याची परवानगी दिली आहे. न्हाव्यांची दुकाने किंवा सलून सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले नाही. तसेच दारूची दुकाने उघडण्याचाही सरकारचा कोणताही आदेश नसल्याचं केंद्रान स्पष्ट केलं आहे…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button