सर्व कार्यकर्ते आले, घाईत तुम्ही निर्णय घेऊ नका, म्हणाल्याने प्रकाश सोळंकेंचे राजीनामास्त्र अखेर म्यान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/7-16.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
उद्धव ठाकरे सरकारचा सोमवारी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यानंतर महाविकास आघाडीमधील काही आमदारांमध्ये नाराजीचे सूर उमटले. या नाराजीनाट्यात प्रकाश सोळंके यांनी पहिली ठिणगी टाकली. प्रकाश सोळंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. तसेच राजकाराणातून सन्यास घेत असल्याचे देखील जाहीर केले.
“सर्व कार्यकर्ते आले, घाईत तुम्ही निर्णय घेऊ नका असं सांगितलं. आज जयंत पाटील, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी बराच वेळ चर्चा केली. त्यातून माझं समाधान झालंय. म्हणून राजीनामा न देण्याचा मी निर्णय घेतला.” असं सोळंके म्हणाले “पवार साहेबांसोबत फोनवरून बोलणं झालं आणि त्यांच्या आदेशानुसार मी माझा राजीनामा मागे घेतो आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी दिली.” यानंतर या राजीनामा नाट्यावर पडदा पडला.
“मला कोणतेही मंत्रिपद नको, पण मला सन्मानाने काम करण्याची संधी द्यावी, हे मी आधीच सांगितलं होतं ते पक्षाने मान्य केलंय”, असंही सोळंके म्हणाले. प्रकाश सोळंके यांच्या प्रश्नावर आता पडदा पडला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.