breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सरकारकडून PPF,सुकन्या समृद्धी खातेधारकांना मोठी सवलत

मुंबई | सरकारने कोरोना व्हायरस या संकटाला पाहता नागरिकांना भविष्य निधी (पीपीएफ), आरडी आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या खातेधारकांना पैसे भरण्याकरता पुढील तीन महिन्याची सवलत दिली आहे. अर्थ मंत्रालयाने शनिवारी यासंदर्भात ट्विट करून महिती दिली आहे. आता पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृद्धी खात्यात २०१९-२० या कालावधीतील पैसे हा ३० जूनपर्यंत भरण्याची सवलत वाढवून देण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे की, सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरात लॉकडाऊनला पाहता छोटी बजत करणाऱ्या धारकांना पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृद्धीमध्ये सूट दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button