breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

समाज विकास विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश

स्नेहा पाटील, शंतनु बिळासकर गुणवत्ता यादीत समावेश

विद्यालयातील ४४ पैकी १८ परिक्षार्थी शिष्यवृत्तीस पात्र

शिराळा । प्रतिनिधी

सागाव येथील समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.

हाय्यर एज्युकेशन सोसायटी संस्थेची शाखा असलेल्या या संस्थेमधील विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग घेतला होता. कु. स्नेहा विजय पाटील हिने २४४ गुण मिळवले आहेत. स्नेहा जिल्हा शिष्यवृत्ती ग्रामीण विभागातील गुणवत्ता यादीमध्ये ९ क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

तसेच, शंतनु अरविंद बिळासकर याने २१४ गुण मिळवले आहेत. जिल्हा शिष्यवृत्ती ग्रामीण विभागातील गुणवत्ता यादीमध्ये शंतनुने ११२ वा क्रमांक पटकावला आहे.

समाज विकास माध्यमिक आणि उच्च माध्यममिक विद्यालयातील ४४ विद्यार्थी-विद्यार्थींंनी परीक्षार्थी होते. त्यापैकी १८ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button