breaking-newsताज्या घडामोडी

सदाभाऊ खोत नव्या पक्षाची घोषणा करणार

औरंगाबाद | माजी कृषी, पणनमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी लवकरच नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीय तसेच तरुणांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी हा पक्ष कार्य करेल, असे सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले.

औरंगाबाद येथे आयोजित रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आपल्या पक्षाचे पहिले अधिवेशन हे एप्रिलमध्ये मुंबईत होणार असल्याचे सांगताना त्यांनी पक्षाचे नाव काय असावे, झेंडा कसा असावा हे जनतेनेच १५ दिवसांत सुचवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button