संसदेच्या पावसाळी अधिवेशनवर कोरोनाचे सावट; पाच खासदारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/parliament-1-300x200-1.jpg)
नवी दिल्ली | टीम ऑनलाईन
सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. चीनपासून ते बेरोजगारीपर्यंत अनेक मुद्यांवरून अधिवेशन वादळी होणार असून, दुसरीकडे करोनाचं सावटही गडद होत आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या आधी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना करोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ऐन अधिवेशनाच्या एक दिवस अगोदरच पाच खासदारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुढील पंधरा दिवस चालणारं अधिवेशन करोनाच्या सावटाखालीच होणार आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेत करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक खबरदारीचे उपाय हाती घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर सभागृह सदस्यांनाही ७२ तास अगोदर करोना चाचणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत पाच लोकसभा सदस्यांच्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अधिवेशनावरील करोनाची भीती आणखी गडद झाली आहे.