breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

वीर योद्धा परतला, पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताकडे सोपवले

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना भारताकडे सोपवले आहे. पाकिस्तानने कागदोपत्री प्रकिया पूर्ण करुन शुक्रवारी संध्याकाळी अभिनंदन यांना भारताकडे सोपवले. अटारी-वाघा बॉर्डरमागे अभिनंदन लवकरच भारतात दाखल होतील.  त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली आहे. अभिनंदन यांचं आगमन होणार असल्या कारणाने नेहमी होणारा बीटिंग द रिट्रीट हा सोहळाही रद्द करण्यात आला. शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा केली.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Visuals from Attari-Wagah border; Wing Commander to be received by a team of Indian Air Force.

560 people are talking about this

अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली . संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. आज दुपारपर्यंत वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती आहे. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Pakistan: Visuals from Wagah in Lahore; IAF Wing Commander will soon be handed over to the Indian Air Force at Attari-Wagah border

314 people are talking about this

हे आमचे शांततेसाठीचे पहिले पाऊल आहे, असा कांगावा पाकिस्तान करीत असला तरी प्रत्यक्षात अमेरिका, सौदी अरेबियासह काही देशांनी आणलेल्या दबावामुळे पाकिस्तानला ही सुटका करणे भाग पडल्याचे स्पष्ट होत आहे. भारतानेही ही सुटका म्हणजे तडजोड नसून जोवर अतिरेक्यांवर ठोस कारवाई करीत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा नाही, असा ठाम पवित्रा घेतला आहे.

भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारताने केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पण भारताने त्यांची विमानं परतवून लावली. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. यानंतर भारताने त्यांच्या सुटकेसाठी सर्वोपतरी प्रयत्न सुरु केले होते. अखेर भारतीय कुटनीतीला यश आलं आणि पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका कऱण्याचा निर्णय घेतला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button