Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला सुरुवात, 672 उमेदवार रिंगणात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Kejriwal-Family.jpg)
- दुपारी 12 वाजेपर्यंत 15.47 टक्के मतदान
नवी दिल्ली | दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 15.47 टक्के मतदान झाले. विधानसभेच्या 70 जागांसाठी 672 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
2015 विधानसभेत आम आदमी पार्टी (आप)पक्षाने 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपला 3 जागांवर समाधान मानावे लागले. तर 15 वर्षे दिल्लीत सत्तेत असलेल्या काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. यावेळची निवडणूक भाजप आणि आपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान दिल्ली निवडणुकीचा निकाल आश्यर्यचकित करणारा असेल असा काँग्रेसने दावा केला आहे.