breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

विदेशात अडकलेल्या 50 शास्त्रज्ञांची हवाईदलाकडून सुटका

नवी दिल्ली | टीम ऑनलाईन

कोरोनाची (Covid-19) लागण झाल्यामुळे विदेशात अडकलेल्या 50 शास्त्रज्ञांची भारतीय हवाईदलाने सुटका केली आहे. त्या सगळ्या शास्त्रज्ञांना भारतात परत आणण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे सर्व शास्त्रज्ञ मध्य आशियातल्या एका देशात अडकले होते. त्या देशातल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण असल्याने त्यांना तातडीने देशात आणणं गरजेचं होतं त्यामुळे हवाई दलाची मदत घेण्यात आली होती.

हवाई दलाने त्यासाठी C-17 ग्लोबमास्टर या मालवाहू विमानाची निवड केली. 9 तासांचा प्रवास करत हे विमान तिथे पोहोचलं आणि त्या सगळ्या शास्त्रज्ञांना घेऊन परत आलं. 19 तासांची ही विशेष मोहिम यशस्वी ठरली. या शास्त्रज्ञांचं इन्फेक्शन कुठल्या पद्धतीचं आहे याची आधीच खात्री भारतीय डॉक्टरांनी केली होती. त्यानुसार त्यांना औषधोपचार घेण्यास सांगण्यात आले होते. हे विमान मोठं असल्याने त्यात कोविड रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली होती.

आवश्य वाचा :भारतामध्ये कोरोना बाधितांच्या अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 5 लाखांच्या खाली

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button