breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

विदर्भात या जिल्ह्यातील लॉकडाऊन स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला निर्णय

चंद्रपूर | कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी 3 सप्टेंबरपासून एक आठवड्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र, कोणतेही राज्य, जिल्हा यांना केंद्र शासनाची परवानगीशिवाय लॉकडाऊन करता येणार नाही, असे निर्देश मोदी सरकारनं दिले आहे. या पार्श्वभूमीवर 3 सप्टेंबरपासून चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येणारे लॉकडाऊन सध्या स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे.

पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी 3 सप्टेंबरपासून एक आठवडा चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र, केंद्र शासनाची परवानगीशिवाय जिल्ह्यात लॉकडाऊन करता येणार नाही, असं जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी स्पष्ट केलं आहे.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितलं की, पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी केल्या घोषणेनुसार 3 सप्टेंबरपासून एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन घेण्याचा प्रस्ताव परवानगीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता. मात्र, या प्रस्तावाला अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे उद्या 3 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणारे लॉकडाऊन तर्तास स्थगित करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. शासनाची परवानगी मिळाल्यानंतर यासंदर्भात तातडीनं निर्णय घेण्यात येईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button