वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूर संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीवर
नवी दिल्ली | खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत राहतात, त्यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीत स्थान देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेत्या आणि मध्य प्रदेशच्या भोपाळमधील खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीचे सदस्य केले गेले आहे. मालेगाव स्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा ठाकूर या आरोपी आहेत. त्या जामिनावर बाहेर आहेत.
साध्वींची संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या कमिटीचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे करीत आहेत. सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव करीत विजय मिळवला होता. संरक्षण मंत्रालयाच्या या समितीत एकूण २१ सदस्य आहेत. यात प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे.