वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क असणार; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हिंदू अविभाजित कुटुंबातील मालमत्तेत मुलींच्या सहभागाच्या हक्कांच्या बाजूने निकाल दिलाय. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने 2005 च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यातील सुधारणेनुसार पालकांच्या मालमत्तेत मुलींचा हक्क असेल असा स्पष्ट निर्णय दिला आहे. तसेच हिंदु उत्तराधिकारी कायद्यात दुरुस्तीच्या वेळी वडील जिवंत होते की नाही याचा विचार न करता तिला वारसा मिळण्याचा हक्क आहे, असेही कोर्टाने म्हटलंय.
सप्टेंबर 9, 2005 रोजी हिंदु उत्तराधिकारी कायद्यातील सुधारणेच्या वेळी वडिल किंंवा मुलगी जिवंंत असल्यासच मालमत्तेवरील हक्काचा प्रश्न निर्माण होतो असे नमुद करण्यात आले होते, मात्र आजच्या या निर्णयानुसार वडिल जिवंत नसल्यासही मुलीचा ह्क्क अबाधित राहिल असे स्पष्ट होत आहे, तसेच मुलगी जिवंत नसली तरी तिची मुले त्यांच्या हक्काचा भाग घेऊ शकतात.
दरम्यान, या निर्णयामुळे पालकांच्या मालमत्तेवर मुलीच्या हक्कांच्या स्वरूपाच्या संंदर्भातील अस्पष्टतेचे निराकरण झाले आहे. खंडपीठाने संबंधित न्यायालयास सर्वोच्च न्यायालयानं अधिकृत निर्णय मिळावा यासाठी अनेक प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. येत्या सहा महिन्यांत त्यांंच्या सुनावण्या घेऊन निकाल लावावेत. असे सांगितले आहेत.