breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

लॉकडाऊन काळात भाडे कसे द्यावे?म्हणत ब्रिटनमध्ये विद्यार्थी, भाडेकरू संपावर

लंडन | लंडनच्या टर्नपाइक लेन स्थानकाच्या बाहेर लिहिलेले आहे की, आतापासून भाड्यासाठी संप. लंडनच्या बहुतांश रस्त्यांच्या बाजूला असेच संदेश लिहिले आहेत. हा संप घरभाडे भरण्याची परिस्थिती नसलेल्या आणि उपजीविकेसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुकारला आहे. विद्यार्थ्यांच्या संपात आता इतर भाडेकरूही सहभागी झाले आहेत. भाडे न फेडू शकल्यामुळे संकटात असलेले काही विद्यार्थी आपल्या सहकाऱ्यांसोबत राहत आहेत. येथेही घरमालक दुप्पट भाडे मागत आहेत. यामुळे लंडनमध्ये रेंट स्ट्राइक म्हणजे भाड्यासाठी संप सुरू झाला असून, यात हजारो नागरिक सहभागी झाले आहेत.

ठिकठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत भाडे देण्यासाठी मुभा मिळावी, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनुसार, आम्ही जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत आहोत. विद्यार्थ्यांनी आपल्या घरमालकांसोबत भाडे कमी करण्यासाठी किंवा अजिबात न देण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. तसेच विद्यापीठातून काढण्यात आलेल्या आणि भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तसेच नोकरी गमावलेल्या आणि स्वत:च्या कुटुंबांना वाचवण्यासाठी सेल्फ आयसोलेट झालेल्यांसाठीही हा लढा सुरू असल्याचे कॅनडातील एका विद्यार्थ्याने सांगितले.

दरम्यान, बहुतांश विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे भाडे माफ करण्यात आले आहे. मात्र घरमालकांनी भाडे माफ करण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. आकडेवारीनुसार, केवळ १९ टक्के विद्यार्थी सध्या विद्यापीठाच्या परिसरात राहत आहेत. दुसरीकडे हाउसिंग असोसिएशन सेंच्युरीचे प्रवक्ते म्हणाले, विद्यार्थी नाराज आहेत, हे आम्हाला माहीत आहे. मात्र आम्ही के‌‌वळ विद्यार्थ्यांना सूट देऊ शकत नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button