breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या आपल्या मुलाला आणण्यासाठी आईने केला तब्बल 1400 किमी स्कुटीवर प्रवास

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेकजण देशाच्या विविध भागात अडकले आहेत. त्यांना आपल्या घरी जाता येईना. .मात्र या सर्व परिस्थितीतही एका महिलेनं लॉकडाऊनमुळे ७०० किमी लांब अडकलेल्या तिच्या मुलाला घेऊन येण्यासाठी चक्क १४०० किमी स्कुटीवर प्रवास केला…

तेलंगणातील निझामाबाद येथे राहणाऱ्या ५० वर्षीय रझिया बेगम आपल्या स्कुटीवरुन ७०० किमी दूर नेल्लोरला गेला. तिथे त्यांचा मुलगा लॉकडाऊनमुळे अडकला होता. त्याला घेऊन त्या पुन्हा स्कुटीवरुन आपल्या घरी परत आल्या. रझिया बेगम निझामाबादमधील बोधन शहरात एका सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. रझिया आपल्या मुलाला आणण्यासाठी सोमवारी सकाळी स्कुटीवरुन निघाल्या. त्या मंगळवारी दुपारी आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथे पोहोचल्या. तेथून त्यांनी आपला १७ वर्षीय मुलगा मोहम्मद निझामुद्दीनला स्कुटीवरुन पुन्हा घरी आणले. बुधवारी सायंकाळी त्या आपल्या घरी पोहोचल्या. या दरम्यान रझिया यांनी तीन दिवसांत १४०० किमी अंतर पार केले. त्यांचा मुलगा नेल्लोर येथे आपल्या मित्राच्या घरी अडकला होता. 

लॉकडाऊनमुळे अशक्य असलेल्या या कामात बोधनचे सहाय्यक पोलिस आयुक्त व्ही जयपाल रेड्डी यांनी रझिया बेगम यांना मदत केली. रझिया यांनी आपल्या मुलाला परत आणण्यासाठी मंजुरी मागितली होती. रझिया यांचा अर्जावर जयपाल रेड्डी यांनी एका विशेष पत्रावर त्यांना मंजुरी दिली. हे पत्र दाखवल्यानंतर त्यांना प्रशासनाने अडवू नये, असा रेड्डी यांचा उद्देश यांचा होता. तरीही रझिया यांना अनेक ठिकाणी पोलिसांनी रोखले. परंतु, जयपाल रेड्डी यांच्या पत्रामुळे त्यांना सोडण्यात आले. त्यामुळे आपल्या मुलाला सुरक्षित घरी आणणे त्यांना शक्य झाले. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button