Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
लॉकडाऊनचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर,निर्मला सीतारामन यांच्या दिलासादायक घोषणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-267.png)
कोरोना विषाणूच्या पार्दुभावामुळे देशात सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलासादायक घोषणा केल्या आहेत.
काय आहेत महत्त्वाच्या घोषणा:
– प्राप्तिकर परतावा भरण्याची (आर्थिक वर्ष २०१८-१९) मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. परतावा भरण्यास उशीर झाल्यास १२ टक्क्यांऐवजी ९ टक्के शूल्क भरावे लागणार आहे.
– आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची अखेरची तारीख ३० जून २०२० पर्यंत करण्यात आली आहे. आधी ही मुदत ३१ मार्चपर्यंत होती.
– मार्च, एप्रिल, मे महिन्यातील जीएसटी रिटर्न भरण्याची तारीखही ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली.
– विवाद से विश्वास तक ही योजना ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. टीडीएसवर व्याज १८ टक्क्यांऐवडी ९ टक्के असेल.