लाहोरमध्ये मोठा बॉम्बस्फोट, आठ जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/1557298406-pakistan_blast_2_AP.jpg)
लाहोर – पाकिस्तानच्या लाहोरमध्ये काही वेळापूर्वीच एक आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला असल्याची माहिती समोर आला आहे. या स्फोटात आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २५ हून अधिक जण यात गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासानुसार, या बॉम्बस्फोटात एक पोलीस वाहन टार्गेट करण्यात आलं होतं. या स्फोटात पाच पाकिस्तानी पोलिसांचा देखील मृत्यू झाला असल्याचं समजतं आहे. या घटनेनंतर हा संपूर्ण परिसर चारी बाजूने घेरण्यात आला आहे. तसंच पाकिस्तानमधील प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पाकिस्तानी वृत्तवाहिनी ‘डॉन’च्या मते, या घटनेत पाच पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून चार सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. १२ एप्रिलला पाकिस्तानच्या क्वेटामध्ये देखील अशाच पद्धतीने बॉम्बस्फोट झाला. यावेळी हजारा समुदायातील लोकांना टार्गेट करण्यात आलं होतं. त्यावेळी झालेल्या स्फोटात १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर २५ हून अधिक जण जखमी झाले होते.
https://twitter.com/ANI/status/1125982664148733952